मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. (Mrs Lata Ekanath Shinde) त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सुंदर ट्विट करत मिसेस मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा खास दिल्या आहेत. (Ekanath Shinde gives birthday greetings to his wife Lata Shinde)
जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तु खंबीरपणे उभी राहिलीस,सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास.तुझ्यासारखी सुजाण,सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो.लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा. pic.twitter.com/nuIKfrt845
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 11, 2022
‘तुझ्यासारखी पत्नी लाभणे हे माझं नशीब आहे’, अशा शब्दात त्यांनी पत्नीचं कौतुक केलं आहे. “जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तु खंबीरपणे उभी राहिलीस, सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास. तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो. लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा”,
असं ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.
एकनाथ शिंदे यांच्या संघर्षात नेहमी त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली आहे. वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं येत असताना पत्नी लता शिंदे यांनी एकनाथरावांना खंबीर पाठिंबा दिला. 22 वर्षापूर्वी 2000 साली एकनाथ शिंदेंनी दोन मूलं गमावली, त्या काळातही लता शिंदे या खचल्या नाहीत, त्यांनी कधीही हार मानली नाही. पुन्हा नव्याने उभं होत आपलं कुटुंब सांभाळलं. रिक्षावाला ते मुख्यमंत्र्यापर्यंतच्या एकनाथ शिंदेंच्या खडतर आणि आव्हानात्मक प्रवासात त्यांनी नेहमीच पतीला साथ दिली.