TOD Marathi

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. याच घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. (Uddhav Thackeray resigned and Ekanath Shinde become new CM) शिवसेनेतील 40 आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि उरलेले आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेल्या निष्ठावंत आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना एक पत्र लिहिलं आहे. (Shivsena party chief Uddhav Thackeray writes a letter to MLAs) या पत्रामध्ये त्यांनी या आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत. “तुम्ही एकनिष्ठ राहिलात आणि बाळासाहेबांचा मंत्र पाळला, त्याबद्दल धन्यवाद” असे भावनिक उद्गार या पत्रामध्ये आहेत.

पत्रात नक्की काय म्हटलंय..?

शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेइमानी करू नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या व प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले.

 

आई जगदंबा आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो.