मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का दिला आहे. आरे येथील मेट्रो कार शेडचा मार्ग आता मोकळा झालेला असून या कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde on Aarey Carshade) यांनी मागे घेतलेले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात घेतला गेलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केला होता. आणि आरे कारशेड दुसऱ्या ठिकाणी होणार असं सुतोवाच केलं होतं. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयाला बदलत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी जोरदार धक्का दिलेला आहे.
जेव्हापासून मेट्रो कारशेड आरे मध्ये होईल, अशा प्रकारच्या बातम्या आल्या तेव्हापासून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं. आदित्य ठाकरे स्वतः त्या आंदोलनात सहभागी झाले होते. (Aaditya Thackeray) पर्यावरण प्रेमी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होते. सत्तांतर झाल्यानंतर आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी आरेमध्ये होणाऱ्या मेट्रोचं कारशेडची स्थगिती काढली आहे.