खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या शिवसेना गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. मात्र, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत आम्ही तीन पत्र पाठवूनही एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप आला. (Vinayak Raut Press Conference)
विनायक राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. १८ जुलैला गटनेतेपदी कोणी क्लेम केला तर आम्हाला आमचं म्हणनं मांडण्यासाठी संधी द्या. अशा पद्धतीची मागणी पत्र देत केली. त्यानंतर २२ जुलैला त्यासंदर्भात भेटून पत्र दिलं. मात्र, अचानक लोकसभा पोर्टलवर जे पत्र वाचलं तेव्हा यामध्ये अध्यक्षांनी पत्राची दखल घेतली नसल्याचे समजले.
आमची बाजू न ऐकता गटनेत्या पदाला मान्यता देण्यात आली. आमच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे, पक्षपातीपणे निर्णय झाल्याची आम्हाला शंका आहे. त्यासंदर्भात आम्ही अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यांना लेखी विचारणा देखील करणार असल्याचे राऊतांनी यावेळी म्हटले आहे.
गटनेतेपदी निवड करण्याचा अधिकार त्या त्या पक्षप्रमुखांना असतो. (Choosing party leader is the right of party chief) त्यामुळे आम्ही जे त्यांना पत्र दिल होत त्याची दखल घेणं गरजेचं होते. परंतु आमच्या पत्राला कोणतही उत्तर न देता एकतर्फि निर्णय घेण्यात आला. शिवसेनेवर लोकसभा कार्यालयाने अन्याय केला आहे. असा आरोप करत आणि यासंदर्भात सुप्रिम कोर्टात धाव घेणार असल्याचेही विनायक राऊतांनी यावेळी सांगितले.
तसेच, आजतरी शिवसेना पक्ष गटनेत मीच आहे. त्यामुळे याबाबतची कायदेशीर लढाई आम्ही करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही आवाहन नक्की देणार आहोत. असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.