नाना पटोलेंचा एक कथित व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चेरापुंजीमधील एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा माझ्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन नाना पटोलेंचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचं सांगतानाच नानांनी याबद्दल उत्तर द्यावं अशी मागणी केली. याच आरोपांवरुन नाना पटोलेंनी स्पष्टीकरण देताना हा लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं तसेच कायदेशीर मार्गेने उत्तर देऊ असं सांगितलंय.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ ?
चित्रा वाघ यांनी, “नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला. तसेच पुढे बोलताना, “सकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्ट येत नाही ती खासगी असते. मात्र जेव्हा ती सार्वजनिक जीवनामध्ये येते तेव्हा लोकप्रितिनिधी म्हणून त्यांना विचारलं पाहिजे. त्यानुसार मी ट्वीट करुन त्यांना विचारलं, “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलातं” या कॅप्शनसहीत हा काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल या गाण्यासहीत एडीट केलेला व्हिडीओ ट्वीट केला.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओच्या सुरुवातीला रोमान्स इन चेरापुंजी, मेघालय असं लिहिण्यात आलं असून एक व्यक्ती एका महिलेच्या गळ्यात हात घालून बसल्याचं दिसत आहे. याच फ्रेममध्ये व्हिडीओत “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, काय आ***, नाना एकदम ओके” असा मजकूर लिहिण्यात आलाय. यात खुर्चीवर महिलेच्या खांद्यावर हात ठेऊन बसलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. त्या महिलेचाही चेहरा दिसत नाही. मात्र पुढच्या फ्रेममध्ये त्या व्यक्तीने जे टीशर्ट घातलं आहे त्याच पद्धतीच्या आणि रंगाच्या टीशर्टमध्ये नाना पटोले अगदी पाश्चिमात्य पेरहावामध्ये दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी हे फोटो पोलो ऑर्कीड हॉटेलमधील असल्याचा दावा फोटोंसहीत करण्यात आलाय.
महाराष्ट्रामध्ये व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडीओचं स्पष्टीकरण मी मागितलं. नानांनी (Nana Patole) यावर व्हिडिओ आपला आहे की नाही हे सांगायला हवं होतं. मात्र ते सांगत आहेत आम्ही कायदेशीर लढाई लढू. अगदी जरूर लढा, आम्ही देखील सर्व लढायला तयार आहोत, असं वाघ यांनी म्हटलंय. माझ्यावर काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हे काँग्रेसचं कल्चर नाही असं सांगितलं जातंय, मात्र मला घाण भाषेत बोललं जात आहे. मेसेज केले जात आहेत. मी प्रश्न विचारला ती माझी चुकी आहे का? असंही त्यांनी म्हटलं आहे.
पक्षातील असले तरी कुणालाही पाठीशी घालण्याचे काम आम्ही करणार नाही
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे की, सोलापूर, रायगड आणि इतर प्रकरणावर मी बोलते. सोलापूर प्रकरणातील त्या महिलेची देखील माझा संपर्क झाला. मी त्यांना भेटायला बोलावलं होतं. मात्र त्या अगोदरच हे व्हिडिओ प्रकरण बाहेर आलं. त्याही वेळेला त्या महिलेला आम्ही आवाहन केलं, जिथे असाल तिथून त्या पदाधिकाऱ्यावर एफआयआर करा. सगळ्या प्रकरणावर आम्ही काम करत असतो. पक्ष म्हणून तात्काळ जे करायचं होतं, ते आम्ही राजीनामा घेऊन केलं. सर्व कायदेशीर कारवाई होणार आहे. कुणालाही पाठीशी घालण्याचे काम आम्ही करणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षातील प्रकरणावर बोलत नाही हे बोलणं चुकीचं आहे, असं वाघ म्हणाल्या.