TOD Marathi

मुंबई :

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून विविध सण उत्सव यांवर मर्यादा होत्या. त्यामुळे दहीहंडी आणि गणेशोत्सवावर विरजण पडलं होतं. पण आता गणेशोत्सव, दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षी हे सण निर्बंधमुक्त असणार आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर त्यांनी हे महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. (Meeting between CM and DCM at Sahyadri guest house)

सध्या कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी तो नियंत्रणात असल्यानं महाराष्ट्रातील सार्वजनिक उत्सव धुमधडाक्यात साजरे होणार आहेत. विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्वाचे निर्णय जाहीर केलेत, काही महत्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे,

  • गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटवली

 

  • गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम सर्व उत्सव निर्बंधमुक्त

 

  • कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार

 

  • महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे निर्देश दिलेत

 

  • गणेश मंडळाच्या नोंदणी शुल्कात कपात

 

  • दहीहंडी साजरी करताना नियम पाळण्याचे आदेश

 

  • पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा