TOD Marathi

लव-जिहाद सारखा कायदा महाराष्ट्रात करण्याची गरज

संबंधित बातम्या

No Post Found

महिलांची सुरक्षा हा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या अजेंड्यवरील महत्वाचा मुद्दा असुन महिलांकडे वाकडया नजरेने पाहणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला. भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदे त्या बोलत होत्या. सरकार कुणाचेही असो अशा घटना घडल्यावर सरकार काय निर्णय घेते ते महत्वाचे. मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पिडीतांच्या जखमांवर मिठ चोळण्याचे काम केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील अडीच वर्षात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना राज्यात महीला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले होते. मुलींवर व महिलांवर अत्याचार व सामुहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली होती. मग ती अमरावती मधील घटना असो किंवा मुंबईतील साकीनाका येथील घटना असो. विदर्भातीलच हिंगणघाट येथे एका महिलेला जिवंत जाळण्याची घटना घडली होती, त्या आठवडयात महिलांना जिवंत जाळण्याच्या बारा घटना पुढे आल्या होत्या. त्यावर आम्ही सरकारकडे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती मात्र अधिवेशन तर घेतले नाहीच उलट आमच्यावरच गुुन्हे दाखल करण्यात आले. एवढेच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाता इतर राज्यातील महिला अत्याचारांचे आकडे सांगीतले ते अतिशय दुखदायक व वेदनादायक होते, असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

गोंदिया येथील महिलेवर गोंदिया व भंडारा येथे करण्यात आलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी कर्तव्यात कसुर करणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये एका आदिवासी महिलेवर अत्याचार करण्यात आले तिथेसुध्दा कर्तव्यात कसुर करणार्‍या पोलीसांना निलंबीत करण्यात आले, पुणे येथील एका महिला दुकानदाराला पोलीसाने मारहाण केली त्याप्रकरणात सुध्दा दोषींवर कारवाई करण्यात आली. एकंदरीत भयमुक्त महाराष्ट्र-भितीमुक्त महाराष्ट्र असे चित्र आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहावयास मिळतील असा आशावादही यावेळी चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात लहान मुलींना बळजबरीने पळवुन नेण्याचे प्रमाण वाढत असुन त्यावर आळा घालण्याकरीता ‘लव्ह जिहाद’ सारखा कायद्याची गरज आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा लव्ह जिहाद सारखा कायदा यावा अशी आमची मागणी आहे. येणार्‍या काळात लव्ह जिहाद सारखा कायदा अस्तित्वात येईल असा विश्वास आहे. वसई येथील मुलीसोबत घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी आहे. पोलीस त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करीत आहेत. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगीतले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज