टिओडी मराठी, दि. 2 जुलै 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अनेक राज्यांत परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची आढळत आहे. अशावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या सहा राज्यांत आता केंद्रीय आरोग्य पथका दाखल झाले आहे. यात केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, मणिपूर अशा सहा राज्यांचा समावेश आहे.
सध्या केरळ राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये गुरुवारी १२ हजार ८६८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आत्तापर्यंत २९.३७ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी झालेल्या १२४ कोरोनाबाधित मृतांमुळे ही संख्या १३ हजार ३५९ वर पोहचलीय.
तर गुरुवारी ११ हजार ५६४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख २१ हजार १५१ झालीय. सध्या फक्त केरळमध्ये १ लाख २ हजार ५८ सक्रिय रुग्ण आहेत.
या केंद्रीय आरोग्य पथकाकडून कोरोनाविरोधी उपाययोजना करत रुग्णसंख्या कशी कमी करात येईल? यासाठी राज्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच या सहा राज्यांमधील दाखल झालेले हे पथक राज्यात राहणार आहे.
विविध आरोग्य भाग, परिसर येथे भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करत रुग्णालयांतील बेड्स, अँब्युलन्स, व्हेंटिलेटरसह अनेक उपाययोजनांचा आढावा घेणार आहे.
तसेच राज्यांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसंदर्भात अनेक उपाययोजना सुचविणार आहेत. केंद्राच्या कोरोना प्रतिबंधनात्मक उपाययोजना योग्यरित्या राबवण्यासाठी तसेच कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाच्या टीम वेळोवेळी अनेक राज्यांत पाठवणार आहेत.
या टीम राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी बातचीत करत कोरोनाविरोधात लढा देताना येणाऱ्या अडचण दूर करण्यासाठी काम करणार आहेत .