TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 जुलै 2021 – मागील अनेक दिवसांपासून सीबीएसई बोर्डचे विद्यार्थी आणि त्याचे पालक 12 वीच्या निकालाची वाट पाहत होते. अखेर तो दिवस आज आलाय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसईच्या 12 वीचा निकाल शुक्रवारी (दि. 30 जुलै रोजी) म्हणजे आज दुपारी 2 वाजता जाहीर करणार आहेत. यंदा मुल्यांकन पद्धतीचा वापर निकाल लावला आहे.

बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिलीय. देशात सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोरोना संसर्गमुळे यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.

असा ठरविला निकाल :
मुल्यांकनाबाबतीमधील १३ सदस्यीय समीतीने मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजन याअगोदर जाहीर केलं होतं. त्यानुसार १२ वीचा निकाल जाहीर करताना त्यात १० वीच्या गुणांचाही विचार करणार आहे.

दहावीच्या गुणांना ३० टक्क्यांपर्यंत महत्व या निकाला देणार आहे. तसेच ११ वीच्या निकालाचे महत्व ३० टक्के आणि १२ वीमधील कमागिरीसाठी ४० टक्क्यांपैकी गुण देणार आहेत. यात चाचणी परीक्षा, प्री बोर्ड एक्झामच्या गुणांचा विचार केला जाईल, असे सांगितलं होतं.

सीबीएसईने १० वी आणि १२ वीला बाहेर बसलेल्यांची परीक्षा ऑगस्ट १६ ते सप्टेंबर १५ दरम्यान होणार आहे, असे सांगितले आहे. नवीन मुल्यांकन पद्धतीने या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करता येणार नाहीत, असे बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

हे विद्यार्थी सीबीएईच्या शाळांमधील आहेत, असे नसून आधीच्या गुणांचा आधार यांचा निकाल लावताना घेता येणार नाही, असे बोर्डाने म्हटलं आहे.

विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतील. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येईल.

CBSEचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपला निकाल बघू शकतील. त्यासाठी त्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल. तसेच सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकर लागेल, असे बोर्डने सांगितले आहे.

इथे पहा निकाल :
cbse.nic.in , cbseacademic.nic.in , digilocker.gov.in