TOD Marathi

US मध्ये 8.2 तीव्रतेचा भूकंप ; Tsunami येणार, सुदैवाने कोणतीही हानी नाही, तरीही नागरिकांमध्ये घबराहट

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, न्यूयॉर्क, दि. 29 जुलै 2021 – अमेरिकेतील अलास्का परिसर बुधवारी जोरदार भूकंपाने हादरला. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री अलास्का परिसरात 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपामध्ये कुठलीही जिवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे युएस जिओलॉलिजकल सर्व्हे यांनी ही माहिती दिलीय. या भूकंपामुळे भविष्यामध्ये त्सुनामी येण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील सर्व समुद्रकिनाऱ्यांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

याबाबत अमेरिकेच्या जिऑलॉजी विभागाने असे सांगितलं कि, रात्री 11.15 वाजण्याच्या सुमाराला जमिनीखाली 29 मैलांवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. सुदैवाने भूकंपाच्या केंद्रापासून दूरपर्यंत या भूकंपाचा प्रभाव जाणवलेला नाही. मात्र, यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांत घबराहटीचे वातावरण आहे.

अशाप्रकारे जमिनीखाली होणारे भूकंप हा त्सुनामीचा इशारा देत असतो, हे याअगोदर अऩेकदा सिद्ध झालंय. अमेरिकेमध्ये याअगोदर आलेल्या त्सुनामीपूर्वी भूकंपाचे सत्र अनुभवायला मिळालं होतं.

भूगर्भातील हालचालींवर त्सुनामीचा अंदाज काढता येतो. यामुळे जर भूकंपाच्या धक्क्यांचे हे सत्र सुरुच राहिलं, तर त्सुनामी येण्याची शक्यता आहे, असे भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

मुख्य भूकंपानंतर त्यापेक्षा कमी तीव्रतेचा दोन धक्के हि काही तासांच्या अंतराने जाणवल्यामुळे अलास्का, अलास्कातील पेनिनसुला आणि एलेयुटियन बेटांना विशेष सतर्कतेचे आदेश दिलेत.

समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. तसेच नागरिकानी स्वतःहून किनारी भागातून काही महिन्यांसाठी इतरत्र स्थलांतरीत झाले आहेत.