TOD Marathi

JEE Mains परीक्षेत अनियमितता ; CBI ची पुण्यात छापेमारीत 7 जणांना घेतलं ताब्यात

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 सप्टेंबर 2021 – इयत्ता बारावीनंतर तंत्रशिक्षणामध्ये पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणयासाठी जेईई मेन ही परीक्षा द्यावी लागते. जेईई मेन परीक्षेचे चौथं सत्र 26, 27 आणि 31 ऑगस्ट आणि 1, 2 सप्टेंबर रोजी घेतलं. मात्र, या परीक्षेत मोठी अनियमितता आढळली. याची चौकशी करत CBI ने आज छापेमारी करत सुमारे 7 जणांना ताब्यात घेतलंय.

आज CBI ने पुणे, दिल्ली आणि NCR च्या काही भागांत छापेमारी केली आहे. यात CBI ने 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. परीक्षेत अनियमितता आणण्यासाठी उमेदवारांकडून सुमारे 15 लाख रुपये घेण्याच्या आरोपाखाली यांना ताब्यात घेतलं आहे.

खाजगी शिक्षण संस्था आणि त्याच्या संचालकांकडून चालू असलेल्या JEE Mains 2021 परीक्षेत अनियमिततेशी संबंधित या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी CBI ने आज पुणे, दिल्ली, जमशेदपूर यांसह देशभरातील विविध शहरांमधील सुमारे वीस जागांवर छापेमारी केली.

या शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि केंद्र सहकारी हे या परीक्षेमध्ये अनियमितता आणण्यासाठी मदत करत होते. यात एक कंपनी, संचालक आणि तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपस पोलीस करत आहेत.