TOD Marathi

मुंबई : नवं सरकार अस्तित्वात आल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि यावर एकच उत्तर येत आहे. दरवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) लवकरच, लवकरच अशा प्रकारचं उत्तर देण्यात येतं होतं.यावर अलीकडेच विरोधी पक्ष नेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी केली होती. अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार का लांबणीवर पडत आहे? याचं उत्तर मात्र कोणीही देऊ शकलेलं नव्हतं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं की न्यायालयीन सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही.

मात्र, असं असतानाही जवळपास 40 दिवस होऊनही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता मात्र आता राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडायला लागल्या आहेत.

उद्या सकाळी 11 च्या सुमारास राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तार आज रात्री देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या महिनाभरात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे दिल्ली दौरे होत होते, यामध्ये मंत्रीपदाची यादी अंतिम करण्याकरीता आहे दिल्ली दौरे होते का? न्यायालयीन सुनावणीसाठी होते का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिल जात होतं. यावर आता आज रात्री किंवा उद्या सकाळी अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहेत.

दरम्यान विधिमंडळातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे. येत्या काळात विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात ही बैठक पार पडल्याची शक्यता आहे. सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येही बैठक सुरू आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आज रात्री किंवा उद्या सकाळी होण्याची दाट शक्यता आहे.