टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 जून 2021 – एप्रिल महिन्यात कोरोनाचा फैलाव कमी झाल्याल्यानंतर रिअल इस्टेटमध्ये पुन्हा तेजीचे वातावरण दिसले आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झालीय. मे महिन्यात नव्या घरांच्या विक्रीची 29 टक्के नोंदणी झाली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये 7 टक्के नोंदणी झाली होती. देशातील आघाडीची रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी असलेल्या ‘नाईट फ्रँक इंडिया’च्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.
‘नाईट फ्रँक इंडिया’च्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यामध्ये 710 नव्या गृहनिर्माण युनिट्सची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत मे महिन्यामध्ये वाढ झाली.
या महिन्यामध्ये 1554 नव्या गृहनिर्माण युनिट्सची नोंदणी झालीय. मात्र, दोन वर्षांपूर्वीच्या म्हणजे मे 2019 मध्ये विक्री झालेल्या 6270 युनिट्सच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात मे महिन्यामध्ये 5360 युनिट्सची मालमत्ता नोंदणी झाली. एप्रिल 2021 मधील नोंदणीच्या तुलनेत हे प्रमाण 47 टक्क्यांनी घटले आहे.