टिओडी मराठी, दि. 30 मे 2021 – महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे गोंधळ उडाला आहे. एका व्यक्तीने निनावी फोन करून मंत्रालयामध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे बॉम्बनाशक पथक त्या बॉम्बचा शोध घेत आहे. सुदैवाने आज रविवाची सुट्टी असल्यामुळे कर्मचारी, अधिकारी सुरक्षित आहे.
आज दुपारी मंत्रालय परिसरामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असा निनावी फोन आला होता. मंत्रालयातील कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्यामुळे तातडीने यंत्रणा जागी झाली आणि सर्वत्र त्या बॉम्बची शोधाशोध सुरू झाली.
ताबडतोब मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले. मंत्रालयातील संपूर्ण परिसरामध्ये बॉम्ब आहे का? याचा तपास सुरू आहे. खबरदारी म्हणून सर्व गेट बंद केलेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.
सुदैवाने आज रविवार असल्यामुळे मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. तसेच कोरोनाच्या नियामवलीमुळे सुद्धा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे. अन्यथा मोठा गोंधळ माजला असता. मात्र, फोन कोणी केला? आदींचा पोलीस शोध घेत आहेत.