मुंबई : राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Goverment ) बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिल्यापासून भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी तीन वाजता भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. तसेच सर्व आमदारांना दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेशही पक्षाच्या वतीनं देण्यात आले आहेत. सायंकाळी पाच वाजता प्रेसिडंट हॉटेलमध्ये (President Hotel ) आमदारांची बैठक पार पडणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी गुरूवारी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिलेत. शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट उद्या (३० जून) मुंबईत येणार आहेत. ही माहिती स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. पण आजच ते गोव्याकडे रवाना होणार आहेत. सुरूवातीला सूरत आणि नंतर गुवाहाटीला (Surat to Guhawati) गेलेले हे आमदार आता गोव्यात जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
भाजपनेही सर्व आमदारांना दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिलेत. उद्या बहुमत चाचणीदरम्यान कोणती रणनीती असेल याबाबत सर्व आमदारांना सुचना यावेळेस देण्यात येतील. सर्व आमदारांना हॉटेल प्रेसिडेंटमध्ये थांबवले जाणार आहे. तिथून हे सर्व आमदार विधानभवनात दाखल होणार असल्याचे समजते.