TOD Marathi

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडायला तयार नाहीत, असं वक्तव्य बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं आहे. आपण १०० टक्के शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानं याठिकाणी पोहोचलो आहोत. आपण या पदापर्यंत पोहोचण्यात आपली किमान २० टक्के मेहनत नक्कीच आहे.

आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेसाठी (Shivsena) खूप काही केल्याचंही पाटलांनी यावेळेस सांगितलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना (Shivsena Rebels MLA) मुंबईला येण्याचे वेध लागलेत. आज दुपारपर्यंत हे आमदार गुवाहाटीहून गोव्याला (Guhawati To Goa ) पोहोचतील.

त्यापूर्वी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची बैठक झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.