TOD Marathi

मुंबई : महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना (Shivsena Leader Kishori Pednekar) पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलं आहे. हे पत्र रायगडहून आलं असून या पत्रातून पेडणेकरांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. हे पत्र रायगडहून आल्याची माहिती मिळत आहे. (Threat letter to Kishori Pednekar)

धमकी मिळण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या पत्रातून किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली असून जिवे मारण्याची धमकीही देण्यात आलीय.

तसेच, सरकार पडू देत मग बघुन घेऊ, असा उल्लेखही या पत्रातून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) यांनीच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आलाय.

धमकीचं पत्र आल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत.

गेल्यावर्षीही किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्यानं किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना तिसऱ्यांदा धमकी आली आहे.