महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व गोंधळ सध्या सुरू आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्यासह आमदारांचा मोठा गट सध्या गुवाहाटीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप या गटाला बळ देतय का अशा चर्चा सुरू आहेत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp state president chandrakant patil) यांनी मात्र या गोष्टीचा इन्कार केला आहे. मात्र असं असलं तरी देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्लीहून महाराष्ट्र दाखल झाले आहेत. आणि राज्यात दाखल झाल्या झाल्या फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेते दाखल झाले आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Ashish Shelar, Pravin Darekar to meet Devendra Fadnavis) ही नेतेमंडळी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झालेले भाजप नेते यांच्यात काय खलबतं सुरु आहेत? एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपा मदत करणार का? याही चर्चांना आता पेव फुटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते. दिल्लीत असताना त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, चर्चा केली. मात्र याबद्दलची जाहीर वाच्यता कुठेही करण्यात आली नव्हती. माध्यमांना याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती किंवा तशी प्रतिक्रिया ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून किंवा भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली नव्हती.