TOD Marathi

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे.

प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती.

 

अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते.

परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.