TOD Marathi

अभिनेता ‘ज्युनियर एनटीआर’नं दिलं बड्डे गिफ्ट! बिग बजेट चित्रपटाची घोषणा…

संबंधित बातम्या

No Post Found

चेन्नई : सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर यानं आपल्या आगामी बिग बजेट चित्रपटाची सोशल मीडियावरून  घोषणा केली आहे. आज एनटीआर ३९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याच निमीत्तानं त्यानं आपल्या चाहत्यांना नवी भेट दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

या चित्रपटाचं मोशन पोस्टरही आता शेअर करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव जरी समोर आले नसले, तरी ‘NTR30’ या नावाने चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. एनटीआरच्या या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन कोर्टाला शिवा करणार आहेत. अभिनेता एनटीआर आणि कोर्टाला एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2016 मध्ये ‘जनता गॅरेज’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही कोर्टाला सिवा यांनी केले होते आणि हा चित्रपट यशस्वी ठरला होता.