TOD Marathi

राज्यात सुरु असणाऱ्या अभूतपूर्व राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशे बॅनर्स लागले आहेत. तर दुसरीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. (SHARAD PAWAR MET NCP MLAS) या बैठकीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना संघर्षासाठी तयार राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत.

शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. (Sharad Pawar spoke with Uddhav Thackeray) यामध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना कठोर भूमिका घेण्याचा सल्ला दिलाच मात्र राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेला कायम राहील असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे असा विश्वास पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तसेच सत्तेमधून बाहेर गेल्यास आपण विरोधात बसण्यासही तयार असल्याचं पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय.
औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील अशा शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले आहेत. (Posters found in Aurangabad as devendra fadnavis CM)

भाजपाकडून झळकावण्यात आलेल्या या बॅनर्सवर ‘हे माऊली तुझा कृपा आशिर्वाद सदैव राहू दे तुझ्या पंढरपुच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे’ असा मजकूर देखील लिहिण्यात आला आहे.