टिओडी मराठी, टोकियो, दि. 31 जुलै 2021 – भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केलं आहे. सिंधूने हा सामना 18-21,12 – 21 असा गमावला आहे.
ताई जू यिंग सध्या जगातील एक नम्बरची खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांत सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब व पाचदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची वर्ल्ड सुपर सीरिज जिंकल्याचा विक्रम आहे. सिंधूने आतापर्यंत ताई जू यिंग हिच्याविरुद्ध 19 सामने खेळलेत. त्यापैकी 5 वेळा तिला विजय मिळवला आहे.
सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. सिंधूने दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला आहे. यासोबत तिनं अंतिम चारमध्ये स्थान पक्कं केलंय. त्यामुळे सिंधूला कांस्यपदक मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.