प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू (MLA Bachhu Kadu to address prahar activists) हे आज अमरावती शहरात मेळावा घेणार आहेत. “मै झुकेगा नही” अशा प्रकारचे पोस्टर्स अमरावती शहरात जिथे मेळावा होतोय त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात मोठी शाब्दिक चकमक झाली होती. आमदार बच्चू कडू यांनी रवी राणांबद्दल काही भाष्य केलं होतं. त्यानंतर, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी खोके घेतले ते गुवाहाटीला गेले (MLA Ravi Rana VS Bachhu Kadu Controversy) अशा प्रकारचे आरोप केले होते. आरोप प्रत्यारोपाच्या या फैरी झाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत त्यांची समजूत काढली होती. (CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis talks with Bachhu Kadu and Ravi Rana) त्यानंतर आमदार रवी राणा यांनी मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं होतं. मात्र, रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. (Ravi Rana apologize over his statement) रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर बच्चू कडू यांनी आपण आपली भूमिका आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे. त्यानंतर एक मेळावा होईल तिथे जाहीर करू असं म्हटलं होतं.
पैसा, सत्ता आणि पद यांच्यासमोर आपण झुकणारे नाही आहोत. माझी भूमिका एक दिव्यांग बांधव या मेळाव्याच्या माध्यमातून जाहीर करेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या जिल्हाप्रमुखांची एक बैठक बोलावली आहे, त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर त्यांची जी भूमिका ठरेल ती भूमिका एक दिव्यांग व्यक्ती मेळाव्यात जाहीर करेल, असं म्हटलं आहे.
रक्ताचे पाणी करून आपण संघटना महाराष्ट्रात उभी केली आहे. सर्वसामान्य माणसासाठी आंदोलनं केली आहेत. त्यामुळे, कोणासमोर झुकण्याचा काही प्रश्नच येत नाही. “मै झुकेगा नही” असे पोस्टर्स बच्चू कडूंच्या अमरावती येथे होत असलेल्या मेळाव्यात लागले आहेत, या पोस्टर्स बाबत बोलताना हे पोस्टर्स म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहे. त्यामुळे आता बच्चू कडू आपल्या मेळाव्यात काय भूमिका जाहीर करतात, सरकारमध्ये राहणार की सरकारला बाहेरून पाठिंबा देणार की तटस्थ भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. बच्चू कडू यांच्या अमरावतीमध्ये होत असलेल्या मेळाव्यासाठी राज्यभरातून त्यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी अमरावतीत आले आहेत.