TOD Marathi

पुण्यात माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. उदय सामंत म्हणाले की, शिवसैनिकांनी हा हल्ला केला नाही असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे माझा शिवसैनिकांवर संशय नाही.मात्र ज्यांनी कुणी हे केलं त्यावर पोलिस योग्य ती कारवाई करतील. हल्लेखोर जर महाविद्यालयीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये कारण त्यामुळे त्याचं भविष्य बरबाद होईल  याप्रकरणी कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. असंही उदय सामंत म्हणाले. (Attack on Uday Samant in Pune)

पुणे पोलीस (Pune Police) यासंदर्भातील चौकशी करतील आणि हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई करतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना मी संपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे. सोबतच राज्यातील काही नेत्यांसह सहकारी आमदार, खासदारांनी देखील माझी विचारपूस केली आहे. मी आत्ता सुखरूप आहे.

सिग्नलवर माझी गाडी थांबली असताना दोन गाड्या माझ्या गाडीच्या आजूबाजूला होत्या. त्यामध्ये काही लोक होती, ज्यांच्याकडे बेसबॉलच्या स्टिक्स, दगडं होती. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. मला मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप शिंदे गटातील आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांनी केला. माझी गाडी समोर आल्यानंतर हल्त्यांलेखोरांनी हत्यारे मला दाखवली. माझ्या गाडीवर दगड भिरकावले.  कोणी कुठे जात असेल, कुणाच्या सभेला जात असेल तर हत्यारं-दगडं कशासाठी?” असा प्रश्नही उदय सामंत यांनी उपस्थित केला.

माझ्यावर हल्ला झाल्यानंर काही जण सांगतायेत की हल्ला करणाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण हत्यारं घेऊन जर काही जण हल्ला करणार असतील आणि त्यांचा हे अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या थराला चाललंय, याचा विचार करण्याची गरज आहे. पण निषेधाचं हे माध्यम असू शकत नाही, असंही उदय सामंत म्हणाले. मी शांत आहे, संयमी आहे, मात्र हतबल नाही असे देखील उदय सामंत म्हणाले.