देशभरात गुरुवारी करवाचौथ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मात्र चर्चा आहे ती म्हणजे राजस्थानमधील उदयपूरचे भाजपचे खासदार अर्जुनलाल मीणा (Arjunlal Meena) यांच्या घरच्या करवाचौथची. 58 वर्षीय खासदार अर्जुनलाल मीणा यांनी आपल्या दोन पत्नी सोबत करवाचौथ साजरा केला. त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
खासदार अर्जुनलाल मीणा यांनी दोन लग्न केले आहेत. मिनाक्षी आणि राजकुमारी असे त्यांच्या दोन्ही पत्नीचे नाव आहेत. मिनाक्षी आणि राजकुमारी (Meenakshi and Rajkumari) या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. राजकुमारी या शिक्षिका आहेत. तर मिनाक्षी या गॅस एजन्सीच्या मालकीन आहेत. या दोघींनीही अर्जुनलाल मीणा यांना ओवाळत करवाचौथ साजरा केला. करवाचौथ व्रताचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
2019मध्ये मीणा हे उदयपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. राजस्थानातून विजयी झालेल्या भाजपच्या 25 खासदारांपैकी ते एक आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते. मीणा यांनी राजस्थानच्या मोहनलाल सुखडिया विद्यापीठातून एमकॉम, बीएड आणि एलएलबीचं शिक्षण घेतलेलं आहे. ते 2003 ते 2008पर्यंत आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून विजयी झाले आहेत.