Antilia case : NIA कडून आणखी दोघांना Arrest, न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जून 2021 – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टेलिया प्रकरणात एनआयएकडून आणखी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयीत आरोपींचे नाव संतोष शेलार आणि आनंद यादव असे आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक भरलेली कार सापडल्यानंतर या प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत.

स्फोटक भरलेल्या कारचे मालक मनसुख हिरेण यांच्या कथित हत्या प्रकरणात एनआयएने दोन संशयीत व्यक्तीला अटक केलीय. दोनही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयामध्ये हजर केले आहे.

न्यायालयात एनआयएने या आरोपींची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केलीय. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींना 21 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावलीय.

या सर्व प्रकरणात निलंबीत पोलिस निरिक्षक सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात किती लोकांचा समावेश आहे? याचा तपास सध्या एनआयएने करत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात सचिन वाझे सह पोलिस निरिक्षक सुनिल माने, सहाय्यक उप निरीक्षक रियाज काजी आणि हवालदार विनायक शिंदे यांना पोलिस सेवूतून निलंबीत केलंय.

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईतील मुंकेश अंबानी यांच्या अन्टेलिया घराबाहेर एक कार सापडली होती. या कारमध्ये स्फोटक आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरेण यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने या सर्व प्रकरणाने वेगळे वळण घेतले.

Please follow and like us: