TOD Marathi

टिओडी मराठी, अमरावती, दि. 17 ऑगस्ट 2021 – तहसीलदारांना शिवीगाळ करणं एका आमदाराला महागात पडलं आहे. याप्रकरणी कोर्टाने तीन महिन्यांची शिक्षा अन् 15 हजारांचा दंड सुनावला आहे. देवेंद्र भुयार असे या शिवीगाळ करणाऱ्या आमदाराचे नाव आहे. हे देवेंद्र भुयार अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदारआहेत.

2013 साली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन माईक अंगावर फेकला होता. याप्रकरणी सुमारे 7 वर्षांनंतर अमरावती अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल देत आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

15 मे 2013 रोजी पंचायत समिती सदस्य असताना देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तहसील कार्यालयामध्ये गेले होते. यात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशीरा का होते?, तुम्ही माझा फोन कट का केला?, असा दम देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना भरला होता. एवढाच नव्हे, तर तहसीलदार लंके यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

शिवीगाळ केल्याचा गुन्हा सिद्ध –
या प्रकरणी तहसीलदार राम लंके यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 353, 186, 294, 506 अंतर्गत पोलिसांनी असा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दोषापत्र दाखल केले होते.

यात गुन्हा सिद्ध झाल्याने अमरावती जिल्हा न्यायालयाने यात महत्त्वाचा निकाल देत देवेंद्र भुयार यांना 3 महिने सक्तमजूरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आणि दंड न भरल्यास पुन्हा दोन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्याचे म्हटलं आहे.