TOD Marathi

गुजरात विधानसभा निकालामध्ये (Gujarat Assembly Result) भाजपाचा जबरदस्त विजय झाला आहे. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय मिळवला आहे. दरम्यान, गुजरातमधील भाजपाच्या या दणदणीत विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. पोकळ आश्‍वासने आणि सांप्रदायिक राजकारण करणाऱ्यांना गुजरातने नाकारले आहे, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी या विजयानंतर गुजरातच्या जनतेचे आभारही मानले.

काय म्हणाले अमित शाह?
“गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले”,

असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

“पोकळ आश्‍वासने, रेवडी वाटप आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे. तसेच विकासाचे राजकारण करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला आहे. या विजयानंतर महिला, तरुण, शेतकरी पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिशी आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे”, असेही ते म्हणाले.

या मोठ्या विजयानंतर त्यांनी गुजरातच्या जनतेचेही आभार मानले. “या ऐतिहासिक विजयाबद्दल मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (President JP Nadda), मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Chief Minister Bhupendra Patel), गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील (State President of Gujarat BJP CR Patil), आणि गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.