TOD Marathi

Tesla शी स्पर्धा करण्यासाठी American Triton ची भारतात गुंतवणूक ; ‘इथे उभारणार मोठा प्रकल्प

टिओडी मराठी, दि. 28 जून 2021 – अमेरिकेतील प्रमुख इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेईकलने जगातील मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला आव्हान दिले आहे. भारतामधील तेलंगाना येथे नवा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे २१०० कोटींची गुंतवणूक केलीय. जाहिराबाद येथे हा प्रकल्प उभारला जात आहे. त्यासंबंधीचा करार नुकताच केला आहे, असे समजते.

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे नवी उत्पादने बाजारात येत आहेत. यामुळे ट्रायटनने अल्ट्रामॉडर्न इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प भारतामध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

यामुळे २५ हजार लोकांना रोजगार मिळणार असून इलेक्ट्रिक सेमीट्रक, सेदान, लग्झरी एसयुव्ही आणि रिक्षासह पुढील पाच वर्षामध्ये ५० हजार वाहने येथे बनविली जाणार आहेत.

यंदा सुरवातीला आणि टेस्लाच्या भारत एन्ट्रीच्या पार्श्वभूमीवर ट्रायटनने ही गुंतवणूक करण्याची योजना आखली होती. त्यावेळी कंपनीने ट्रायटन एन ४ ही नवी इलेक्ट्रिक सेदान भारतामध्ये चार व्हेरीयंटमध्ये लाँच केली जात आहे, असे जाहीर केले होते.

भारतात बेस मॉडेलची किंमत ३५ लाख रुपये इतकी असेल. अर्थात या कार्सचे उत्पादन अमेरिकेत होणार आहे, असे देखील समजते.