TOD Marathi

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मागील 56 वर्षाची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख साहेब ठाकरे (Shivsenapramukh Balasaheb Thackeray) यांनी अनेक वर्ष या मेळाव्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या मेळाव्यात एक झेंडा, एक नेता, एक मैदान अशा पद्धतीने भूमिका शिवसेनेची राहील. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार याबद्दल आम्हा शिवसैनिकांच्या मनात कोणतीही शंका नाही. अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shivsena Leader Ambadas Danve) यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना म्हणत शिवसेनेचे काही आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने केले.

त्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. कारण यापूर्वीच शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मुंबई महापालिकेला दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यासंदर्भात अर्ज देण्यात आलेला आहे ज्यावर कुठलीही प्रक्रिया झालेली नाही. तसेच शिंदे गटाच्या वतीने आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांनी देखील आम्ही शिवसेनेचाच दसरा मेळावा करणार आहोत असं म्हणत अर्ज दाखल केलाय.

दसरा हिंदूंचा सण आहे, सर्वांनीच साजरा केला पाहिजे. मात्र, शिवसेनेसाठी एक झेंडा, एक नेता, एक मैदान असेल, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होईल आणि उद्धव ठाकरे त्या मेळाव्याला मार्गदर्शन करतील असेही अंबादास दानवे म्हणाले.