सिंधुदुर्ग: भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत. तपास यंत्रणांनी कारवाई करताच रडू लागतात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच हिंमत असेल तर राजीनामे देऊन कारवाईला सामोरे जा. मग काय होते ते पाहा, असं आव्हान निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला केलं आहे.
निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कुडाळ पंचायत समितीतील तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडत आहेत. त्यामुळे नक्कीच यामध्ये काही गडबड असणार. गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
अजित पवार साहेब असू शकत नाही. राष्ट्रवादीत सगळे रडे भरलेले आहेत. यांच्यावर आरोप झाले की रडतात. कारवाईला सामोरं जावं आणि राजीनामा द्यावा. मग तुमचं काय होते पाहा, असं आव्हानच त्यांनी अजित पवार यांना दिलं.