TOD Marathi

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. या लोकांना लाज वाटली पाहिजे. मानवी जीवनाची किंमत फक्त ४५ लाख रुपये आहे का, असा सवालही ओवैसी यांनी केला आहे.

एका मध्यमासोबत संवाद साधतांना ओवैसी म्हणाले की, या लोकांना लाज वाटली पाहिजे. मानवी जीवनाची किंमत फक्त ४५ लाख रुपये आहे का? उत्तर प्रदेश सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करत हिंसाचारात मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. याविषयो बोलतांना ओवैसींनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजपा सरकार कोणाला मूर्ख बनवत आहे. तसेच, पंतप्रधानांनी अनेक आरोपांनंतर अजय कुमार मिश्रा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. जर आरोपी मंत्र्याचा मुलगा असेल तर न्याय कसा मिळेल, असा सवालही यावेळी ओवैसींनी केला आहे.