TOD Marathi

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. राज्यात कुठल्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीनेच मुख्यमंत्री व्हावे, असे म्हणणे योग्य नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

पवार यावेळेस म्हणाले की, तृतीयपंथी व्यक्ती पण मुख्यमंत्री होऊ शकते किंवा एखादी महिला अथवा कुठल्या जातीधर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते. यामध्ये काहीच हरकत नाही. जो कोणता पक्ष १४५ चा बहुमताचा आकडा जमवेल त्यांचा मुख्यमंत्री बसेल.

दरम्यान ब्राह्मण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. केवळ नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाला आता आपण पाहू नये. अशा एवढ्या छोट्या अपेक्षा व्यक्त करू नका. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य दानवे यांनी नुकतच केलं होतं.