पाच विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यामध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसने 64 जागा जिंकत विजय प्रस्थापित केला आहे. तर केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला 40 जागांवर समाधान मानावं लागत. त्यानंतर अनेक नेत्यांनी आपलं मत माडंल. काहींनी निवडणुकीचं विश्लेषण केलं.
तेलंगणाच्या विजयामध्ये काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं पहायला मिळालं. याबद्दलच अजित पवारांनी एक विधान केलं आहे.
“तेलंगणात रेड्डी म्हणून जी व्यक्ती होती तो एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता त्याला काँग्रेसनं खेचलं म्हणून तेलंगणातील चित्र वेगळं दिसतंय नाहीतर तिथंही वेगळी परिस्थिती असती. तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहे ते सगळीकडं जाहीराती देत होते, महाराष्ट्रात ज्यांनी सभा घेतल्या. इतक्या चांगल्या योजना राबवतोय असं त्यांनी दाखवलं. त्याची जाहिरातबाजी झाली. लोकांनी तर त्यांना नाकारलं त्यामुळं खरं काय झालं काय माहिती? जनता जनार्दन सर्वोच्च असते” असं अजित पवार म्हणाले