TOD Marathi

बाराबंकी: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणे आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कार्यक्रमादरम्यान झालेली गर्दी ओवैसींनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर हे गुन्हे दाखल केले गेले आहेत. यावेळी ओवैसी यांनी भडकाऊ भाषण केले, तसेच त्यांनी पंतप्रधान, भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात चुकीच्या शब्दांचा वापर केला, असे आरोप करण्यात आले आहेत.

खासदार ओवैसी यांच्यावर या प्रकरणात भादवि कलम १५२अ, कलम १८८, कलम २६९, कलम २७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तामधून समोर आली. ओवैसी यांनी या कार्यक्रमात, रामस्नेही घाट येथील मस्जित प्रकरणावर विधान केले होते.