TOD Marathi

नवी दिल्ली: १० सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोना झाल्याचे आढळून आले. त्याच सोबत प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे.

मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं.

मात्र, हा सामना कोरोनामुळे स्थगित झाला नसून पुढची परिस्तिथी पाहता रद्द केला असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टॉम हॅरिसन यांनी म्हटलं आहे. भारत इंग्लंड यांच्यातील सामना पुढे ढकलला तर आयपीएलला मोठा फटका बसू शकतो, असं वृत्त इंग्लंडमधील माध्यमांनी दिलं आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सिरीज आता संपली आहे. उर्वरित सामना जरी खेळवला गेला, तरी सामना हा मालिकेचा भाग नसणार असल्याचं, टॉम हॅरिसन यांनी म्हटलं आहे.