टिओडी मराठी, दि. 9 जुलै 2021 – विकास करण्यासाठी नवीन प्रोजेक्टच आमिष दाखवायचं आणि त्यासाठी खूप कर्ज पुरवठा करायचा आणि ‘त्या’ देशाला कर्ज फेडता न आल्यास त्याची जमीन बाळकवायची असा खेळ चीन खेळत आहे. आता याच चीनने श्रीलंका, मालदीवनंतर मॉन्टेनेग्रो देशाला आपल्या कर्जाच्या जाळ्यात ओढलं आहे. आता या देशातील देखील चीनचा ‘ड्रॅगन’ जमीन बळकावणार असल्याचं समजत आहे.
चीनच्या कर्जाच्या चक्रव्युव्हामधये आजवर अनेक देश फसलेत. आता आणखी एक देशाची अशीच काहीशी परिस्थिती झालीय. युरोपमधील मॉन्टेनेग्रो नावाच्या छोटाशा देशाने चीनकडून सुमारे एक अब्ज डॉलर कर्ज घेतले होते आता याची परतफेड करण्यात हा देश असमर्थ ठरला आहे.
देशातील बेल्ट अँड रोड प्रकल्पासाठी चीनकडून मॉन्टेनेग्रो देशानं कर्ज घेतलं होतं. याअंतर्गत मोठा महामार्ग तयार करण्याचं काम सुरू होतं. पण, काही किलोमीटरचं काम पूर्ण होऊ शकलं. आता श्रीलंका आणि मालदीवनंतर मॉन्टेनेग्रो देश हि चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली आला आहे.
मॉन्टेनेग्रो देशाला चीनकडून घेतलेलं सारं कर्ज फेडावं लागणार आहे. जर असं केलं नाही, तर देश दिवाळखोर म्हणून घोषित केला जाणार आहे. चीन या देशाच्या जमिनीवर आपला दावा ठोकू शकतो.
याबाबत डेली मेलच्या अहवालानुसार, चीनची सरकारी कंपनी चायना रोड अँड ब्रिज कॉर्पोरेशन या प्रकल्पाशी जोडलेली आहे, ही हैराण करणारी बाब आहे. या प्रकल्पाअंतर्गत ज्या पुलाची निर्मिती केली जातेय. त्यासाठी कामगार हि चीनमधून मागविले आहेत. पण, या महामार्गाचं काम काही पूर्ण झालेलं नाही.
मॉन्टेनेग्रो देशाला याच महिन्यामध्ये एक अब्ज डॉलरचा पहिला हप्ता चीनला द्यायचा आहे. पण, इतके पैसे देश देऊ शकणार आहे का?, याची कोणतीही स्पष्टता नाही.
सध्या देशाच्या एकूण जीडीपीपेक्षाही दुप्पट देशावर कर्ज झालं आहे. चीनसोबत झालेल्या एका करारानुसार, जर मॉन्टेनेग्रो देशाने वेळेत कर्जाची रक्कम चुकती केली नाही, तर चीनकडे देशाच्या जमिनीवर हक्क सांगेल, हा चीनचा अधिकार असेल.