TOD Marathi

निवडणूक आयोगाचा निर्णय हा अपेक्षित नव्हता, आता लढायचंही आहे आणि जिंकायचंही आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न गद्दारांनी केला. गद्दारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी छातीवर वार करावेत, पाठीवर नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जळजळीत टीकास्त्र सोडलं. (Aditya Thackeray on Election Commission Decision) जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं, आमची तयारी आहे, असं म्हणत एक प्रकारे खुलं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं आहे. (Aditya Thackeray challenged Shinde group)

आमदार आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघात भेट दिली. यादरम्यान, त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी होत असताना आत्मविश्वास आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर (Election commission freezes Shivsena Party symbol) ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी वरळी दौऱ्यात दिलेल्या प्रतिक्रियेनंतर शिंदे गटाचे नेते नरेश मस्के (Shinde group leader Naresh Mhaske replied to Aditya Thackeray) यांनी देखील आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जे शिवसेनेचे तत्व विसरले ते आता सहानुभूती गोळा करण्यासाठी अशा प्रकारची काम करत आहेत, असं नरेश मस्के यांनी म्हटलं.

शिवसेना हे शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. त्यातच वरळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती.