युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuvasena Chief Aditya Thackeray criticized government) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta Foxconn Project) अन्य विविध प्रकल्पांबद्दल अनिश्चितता आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या कामासंदर्भातील जाहिराती या अन्य राज्यात देण्यात येतात असा सनसनाटी आरोप देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray PC in Mumbai) यांनी राज्य सरकारवर केला. नोकरी महाराष्ट्रात मात्र नोकरी भरती संदर्भातील जाहिरात आणि मुलाखतीत चेन्नईत अशी स्थिती आहे. येत्या रविवारी एका महत्त्वाच्या प्रकल्पातील नोकऱ्यांसाठी चेन्नईत मुलाखती होणार आहेत. यामुळे राज्यातील तरुणांचे खच्चीकरण होत आहे असा देखील गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत रोजगारा संदर्भातील विविध मुद्दे मांडत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले.
आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे;
बल्क ड्रग पार्कबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टता नाही
वेदांता फॉक्सकॉन बाबत महाराष्ट्र सरकारकडून
फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल कुठलंही अधिकृत उत्तर नाही
एअरबस प्रकल्पबाबतीतही अनिश्चितता
खोके सरकारने इतर प्रकल्पांचा आढावा सुरू केलाय
कोणत्या प्रकल्पांना स्थगिती दिली याबाबत स्पष्टता नाही
राज्यात रोजगार किती वाढेल हे महत्त्वाचं
MTHLA चं काम 80 टक्के पूर्ण झालं
कोस्टल रोडचेही काम 63 टक्के पूर्ण
वर्सोवा-बांद्रा सी लिंकचे काम दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आलं आहे
नव्या कंपनीने भरतीसाठी जाहिरात दिली आहे ती दुसऱ्या राज्यात
त्यामुळे राज्यातील प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना संधी नाही
नोकरी मुंबईत असेल मात्र नोकरीसाठी च्या मुलाखती अन्य राज्यात
राज्यातील प्रकल्पांमध्ये राज्यातील तरुणांना संधी मिळावी
महाराष्ट्रातील तरुणांचं खच्चीकरण चालल्याने संतापाची भावना
मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे
अशाप्रकारे रोजगाराबाबत आणि महाराष्ट्रातील प्रकल्पांना आवश्यक असलेल्या नोकऱ्यांसाठी अन्य राज्यात होत असलेल्या मुलाखतींबाबत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप नोंदवला आणि राज्य सरकारवर टीका केली.