TOD Marathi

औरंगाबाद:

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी गलिच्छ शब्दात वक्तव्य केले. (Abdul Sattar statement on Supriya Sule) त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गट किंवा महाविकास आघाडीची भूमिका काय आहे, यापेक्षा राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलनं केली. “शिंदे-फडणवीस सरकारने अब्दुल सत्तार यांना पदमुक्त केले पाहिजे. हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचे नाव आले होते. राज्यात ओला दुष्काळ असताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) स्वत:च्या मतदारसंघात बांधावरही गेले नाहीत. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्याचा विषय बाजूला ठेवा. पण कुठल्याही महिलेला अशाप्रकारे शिवीगाळ करणे योग्य नाही. अब्दुल सत्तारांच्या मनातील गोष्टी ओठावर आल्या आहेत. हा गलिच्छपणा आहे,” असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटले. ते मंगळवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी आक्रमकपणे अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणे गरजेचे आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मला अपेक्षा नाही. तसेच याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग काय कारवाई करणार, हेदेखील पाहावे लागेल. नुसत्याच नोटीस पाठवून फायदा नाही, अब्दुल सत्तार यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. सोमवारी राज्यात दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (NCP Delegation led by Jayant Patil met Governor Bhagatsingh Koshyari) यांच्या भेटीला गेले होते.

अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दिवसभर महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून माफी मागण्याचे आदेश दिल्याचेही वृत्त होते. (CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis called Abdul Sattar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले होते.  सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची माफी मागण्याचे आदेश दिले होते.