TOD Marathi

Actress Kangana Ranaut 6 महिन्यांपासून आहे बेरोजगार!; हाताला नाही काम; Tax भरण्यासाठी नाहीत पैसे

टिओडी मराठी, दि. 10 जून 2021 – कोणत्याही विषयावर आपल्या सडेतोड वक्‍तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत सध्या बेरोजगार आहे.कारण, मागील 6 महिन्यांपासून तिने टॅक्‍स भरलेला नाही. तसेच तिने स्वतःच याबाबतचा खुलासा करत तिच्याकडे पैसे शिल्लक नाहीत, असे सांगितले आहे.

कंगना स्वतःला सर्वाधिक जास्त टॅक्‍स भरणारी अभिनेत्री समजते. मात्र, मागील 6 महिन्यांपासून ती बेरोजगार आहे. तिने टॅक्‍स न भरू शकण्याचे कारण सांगितले आहे. सध्या तिच्याकडे खूप पैशांची तंगी आहे. कंगना सर्वाधिक टॅक्‍सच्या श्रेणीमध्ये येत आहे. आपल्या उत्पन्नातील 45 टक्‍के हिस्सा ती टॅक्‍स ती भरते.

मात्र, सध्या काम नसल्यामुळे ती टॅक्‍स वेळेवर भरू शकली नाही. आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात असे पहिल्यांदा घडले आहे, टॅक्‍स भरायला पहिल्यांदाच तिला उशीर झालाय.

तरीही सरकार आपल्या पेंडिंग टॅक्‍सवर व्याज लावते आहे. पण, तरीही आपण याचे स्वागत करत आहे, असे कंगनाने म्हटले आहे. सध्याची वेळ आपल्या सगळ्यांसाठी खूप अवघड आहे.

आपण सर्वंनी एकमेकांना मदत केली पाहिजे, असेही कंगना म्हणाली आहे. आगामी काळात कंगणा थलायवी, धाकड आणि तेजस या तीन सिनेमांत दिसणार आहे.