TOD Marathi

Maharashtra राज्यातील सुमारे 644 गृहप्रकल्प Blacklists ! ; प्रकल्पांना होतोय विलंब, शिस्त लावण्यासाठी उचललं पाऊल

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 1 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यातील सुमारे 644 गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने काळ्या यादीत टाकले आहे. या प्रकल्पांना होत असलेल्या विलंबामुळे बांधकाम व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी महारेराने हे पाऊल उचललं आहे. या 644 गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी आणि सांगली येथील प्रकल्पांचा समावेश आहे.

या गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने घरांची विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा त्यांच्या प्रकल्पाचे प्रमोशन करण्यास मनाई केलीय. महत्त्वाचे म्हणजे या गृहनिर्माण प्रकल्पांमधील सुमारे 80 टक्के फ्लॅट अगोदर विकले गेलेत.

महारेराने काळ्या यादीमध्ये टाकलेले प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. दिलेली तारीख उलटून अनेक वर्ष झाल्यानंतरही ग्राहकांना घरांचा ताबा मिळत नाही. 644 पैकी 16 प्रकल्प हे 2017 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. तर 84 टक्के प्रकल्प 2018 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते.

पण, बांधकाम व्यावसायिकांनी चालढकल केल्यामुळे अद्यापही ग्राहकांना घराचा ताबा मिळाला नाही. 644 पैकी 274 गृहप्रकल्प मुंबईतील आहेत, तर 189 प्रकल्प पुण्यामधील आहेत. 181 प्रकल्प उर्वरीत राज्यामध्ये आहेत.