कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर आज प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं येणार आहेत. मात्र या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
“हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा” – राम शिंदे
माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिंदे म्हणाले, या जयंतीला आमदार रोहित पवारांकडून राजकीय स्वरूप देण्यात आले असून हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा असल्याची टीका राम शिंदेंनी केलीय. दरम्यान, अहिल्यादेवी भक्तांची कुचंबना होतेय, या जयंतीला राजकीय स्वरूप देणे चुकीचे आहे. प्रशासनावर राजकीय दबाव देण्यात येत असल्याचा आरोप शिंदेंनी केलाय.