वेस्ट इंडिजविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. सामन्याच्या अगोदर पत्रकारांशी बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपली रणनीती सांगितली आहे. रोहितने म्हणाला की युवा फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तसेच, ओपनिंगमध्ये उजवे-डावे संयोजन असेल. यासोबतच प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटू खेळतील.
रोहित शर्मा म्हणाला, ‘विकेट पाहता, मला विश्वास आहे की आम्ही दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह खेळू. फलंदाजीचा विचार केला तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्याला या क्रमांकावर खेळायचे आहे. गिलने प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सांगितले की, तो संपूर्ण कारकिर्दीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळला आहे.
हेही वाचा” …फडणवीसांबाबत ‘कलंक’ हा शब्द योग्यच, कॉंग्रेस नेते अतुल लोंढेंचं वक्तव्य”
रोहितही सांगितले की, बऱ्याच काळानंतर डाव्या-उजव्या सलामीच्या जोडीने तो खूश आहे. ‘भारतीय क्रिकेटसाठी हा रोमांचक काळ असेल, आम्हाला नवा खेळाडू मिळाला आहे आणि आम्हाला आशा आहे की तो दीर्घकाळ चांगला खेळेल. डाव्या हाताच्या सलामीवीरासाठी आम्ही बराच काळ वाट पाहत होतो.” भारताचा हा डावखुरा सलामीवीर बहुधा यशस्वी जैस्वाल असल्याची सर्वांना खात्री आहे. चेतेश्वर पुजाराच्या संघातील अनुपस्थितीने भारतीय टॉप ऑर्डरमध्ये स्थान निर्माण केले आहे. मुंबईचा अत्यंत प्रतिभावान डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल आपल्या ‘नावा’प्रमाणे यशस्वी होईल अशी आशा आहे.
केवळ १९ कसोटी खेळणारा खेळाडू मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखाली भारताचे पाच जणांचे वेगवान आक्रमण वेस्ट इंडिजच्या वेगवान आक्रमणाच्या तुलनेत कमकुवत दिसत आहे.