शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं बंड गेल्या तीन दिवसात थंड होण्याचं नाव घेत नाही. याउलट शिवसेनेच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर एकनाथ शिंदे परत येतील का? अशी शक्यता वाटत होती मात्र आमदार संजय शिरसाट यांच्या वतीने एक पत्र लिहिण्यात आले आणि ते पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं याचा अर्थ काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा बंडखोर गटावर परिणाम झाला नाही. (Ekanath Shinde tweets letter to Uddhav Thackeray)
गेले तीन चार दिवस महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. आम्ही या वातावरणात प्रेमाचा सरकार टिकणार का अशी भीती किंवा धाकधूक महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांनीही अजय चौधरी हेच शिवसेनेचे गटनेते आहेत असं विधान केलं. (Narhari Zirwal stated that Ajay Chaudhari is Legislative party leader) त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला अशा चर्चा होत्या. मात्र अजूनही सरकार अडचणीत आहे आणि यात पुढचा किती कालखंड सरकार सुरळीत चाललेल्या यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एकीकडे राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष होत असताना महाविकास आघाडी सरकारने मात्र अवघ्या चारच दिवसात 157 जीआर काढलेले आहेत. या 157 जीआर मध्ये वेगवेगळ्या विभागांशी संबंधित जीआर आहेत. (MVA govt released 157 GR in 4 days) अनेक रखडलेली कामे आणि फाइल्स यानिमित्ताने मार्गी लागणार आहेत. यानिमित्ताने फाइल्सचा निपटारा होतोय, मात्र एवढ्या घाईने आणि कमी कालावधीत एवढे मोठे जीआर काढण्याची ही सरकारची कदाचित पहिली वेळ आहे. मात्र हे नेमकं कशाचं द्योतक आहे? यावरही आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. ज्या घाईने जीआर काढण्याचा सपाटा लावलेला आहे, ते पाहता सरकार कोसळणार का किंवा या सरकारमधील मंत्र्यांना आता सरकार जाण्याची भिती वाटतेय का? असाही प्रश्न चर्चिला जातोय.