TOD Marathi

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांचे बंड काही थंड होण्याचे नाव घेताना दिसत नाही. हे होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंडखोर आमदार यांचा संजय राऊत (Sanjay Raut) यांना मोठा विरोध होता, संजय राऊत यांना राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election 2022 Maharashtra) पाडण्याचा विचारही बंडखोर आमदारांनी केला होता. असं झालं असतं तर तो शिवसेनेसाठी मोठा पराभव आणि त्याचबरोबर प्रचंड मोठा धक्का राहिला असता. मात्र एकनाथ शिंदे यांनीच बंडखोर आमदारांना तसं करण्यापासुन रोखल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं ते ट्विट केलं होतं. त्या पत्रामध्ये संजय शिरसाट यांनी उल्लेख केला की आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तासनतास ताटकळत राहावे लागत होतं. शिवसेनेच्या सो-कॉल्ड चाणक्यांसोबत फोनवरून अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती, आमचे फोन रिसीव्ह केले जात नव्हते. त्यामुळे आता संजय शिरसाट यांच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे हे चाणक्य म्हणजे संजय राऊत होते का? आणि संजय राऊत यांनाच बंडखोर आमदारांचा विरोध आहे का? याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे.