TOD Marathi

मुंबई : ‘‘आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आपले सर्वाचे सुखदु:ख आता एकच असून, सारे एकजुटीने राहू’’, असे आवाहन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत आपल्या गटातील आमदारांच्या बैठकीत केले. त्यांनी प्रथमच आपल्या पाठिशी भाजप असल्याचे सूचित केल्याने या बंडामागे भाजप असल्याच्या आरोपाला आता बळकटी मिळाली आह़े. (Ekanath Shinde assured to supporting MLAs)

शिवसेनेतील बंडात सामील झालेल्या पक्षाच्या आमदारांची संख्या वाढुन गुरुवारी ३७ झाली. चार मंत्र्यांसह काही अपक्ष आमदार बरोबर असल्याने ४६ आमदारांचे संख्याबळ झाले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची बंडखोरांची मागणी मान्य करण्यास शिवसेना तयार असल्याचा संदेश पक्षाकडून देण्यात आला होता. तसेच गुवाहाटीतील काही शिवसेना आमदार संपर्कात असल्याचा दावाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. यानंतर नगरविकास मंत्री व बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आपल्या गटाची गुवाहाटीत बैठक घेत मार्गदर्शन केले. त्याचे चित्रिकरण सर्वत्र प्रसारित करण्यात आले. (Video of mla meeting with Ekanath Shinde was published)

‘‘आपल्या पाठिशी मोठा पक्ष आहे. ती एक महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. तुम्ही लोकांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. राष्ट्रीय पक्षाने सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे. वेळप्रसंगी काहीही कमी पडणार नाही’’, अशी खात्री शिंदे यांनी दिली आहे. आपला  गट एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न शिंदे करत असल्याचे स्पष्ट झाले.