शिवसेना नेते आणि ठाकरे सरकार मधील महत्त्वाचे मंत्री एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. मात्र नॉट रिचेबल असलेल्या शिंदे यांनी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मंत्री एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. (Shivsena leader Ekanath Shinde not reachable) त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. (Facebook post of Ekanath Shinde)
“योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…”,
अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
या फेसबुक पोस्टमध्ये योग दिनाच्या शुभेच्छा देताना कमळाच्या फुलाचा बॅकग्राऊंड वापरला आहे, त्यावरूनही अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. दुपारच्या सुमारास एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत आहे.
काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. सूरतच्या ‘ली मेरिडिअन’ हॉटेलात ते थांबले आहेत. काल रात्री उशीरा ते हॉटेलमध्ये गेले असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ते नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं जातं आहे. सगळीकडे राजकीय चर्चांना उधान आलेलं असतानाही ते रिचेबल झालेले नाहीत किंवा त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रियाही आलेली नाही. (Ekanath Shinde in Gujrat)
शिवसेनेसह अपक्ष अशे थोडेथोडके नव्हे तर पंचवीस आमदार त्यांच्या सोबत आहेत असंही वृत्त आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समजली होती. ते आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार इत्यादी आमदार त्यांच्या सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.