TOD Marathi

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. (Ekanath Shinde not reachable) उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती आहेत. त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. असं असताना एकनाथ शिंदे यांची नाराजी नेमकी कशाबद्दल आहे ? असा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला आहे. जाणून घेऊयात एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची काय कारणं आहेत… (Why Ekanath Shinde is not reachable?)

१) मविआ सरकारमधील (MahaVikas Aghadi) तीन पक्षांत चढाओढ असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालंय. अंतर्गत घुसमट वाढत गेल्यानं मंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं बोललं जातंय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या राजकारणातली घुसमट वाढल्यानं एकनाथ शिंदे टोकाचा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. शिवसेना इतर दोन पक्षांसोबत सरकार चालवताना राजकीय घुसमट होत असल्यानं गेले बरेच दिवस एकनाथ शिंदे अस्वस्थ होते.

२) शिवसेना नेते असलेले एकनाथ शिंदे हे सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात होतं. त्यांना मुख्यमंत्री पदाची आस असेलही. मात्र भाजपसोबत बोलणी फिस्कटली आणि त्यानंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली. तिनही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत का? अशीही चर्चा सुरू आहे.

३) एकनाथ शिंदे हे ठाण्यातील लोकप्रतिनिधी असले तरी त्यांना मानणारा वर्ग राज्यभरात आहे. काही आमदार तर त्यांचे कट्टर समर्थक आहेत. अशावेळी नेतृत्वावरून शिवसेनेत स्पर्धा आहे का? आणि असेल तर त्यामध्ये एकनाथ शिंदे हे महत्वाच्या स्थानी नाहीत का? अशाही चर्चा बर्‍याचदा होतात.

४) शिवसेनेत मोठा वट असलेले एकनाथ शिंदे यांची क्षमता शिवसेनेला माहिती आहे. मात्र असं असूनही त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यासाठी डावललं गेल्याचा आरोप होतोय.

५) महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामध्ये सगळ्यांना सांभाळत असताना शिवसेनेच्याच महत्त्वाच्या नेत्यांच्या घुसमट झाली का? अशी चर्चा अनेकदा दबक्या आवाजात होत असते. या सगळ्या नाराजीचं नेतृत्व कदाचित एकनाथ शिंदे करत आहेत का? अशी चर्चा आता सुरू आहे.