शिवसेना नेते आणि ठाकरे सरकार मधील महत्त्वाचे मंत्री एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. (Narayan Rane on Ekanath Shinde)
“शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी निर्णय घेतलास. नाहीतर तुझाही आनंद दिघे झाला असता ”
असं नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Narayan Rane tweeted about Ekanath Shinde)
भाजपमध्ये असलेले नारायण राणे एकेकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेच्या बऱ्याच गोष्टी नारायण राणे यांना माहिती आहेत. शिवसेना (Shivsena) सोडल्यापासून शिवसेनेला भजनाची एकही संधी नारायण राणे यांनी सोडली नाही.
एकनाथ शिंदे नॉटरिचेबल असल्यानंतर नारायण राणेंच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे ज्यांच्या मार्गदर्शनात राजकारणात आले त्या आनंद दिघे यांचा उल्लेख राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. (Anand Dighe Shivsena)